खुशहाल "अय पोरा धा रुपय दि" असा ठसकावल्याचा आवाज येत, हाडकुळ्या काळपट हाताने माझा दंड धरला, कंबरेत शरीर वाकलेलंच होत त्याचबरोबर मानही थोडीशी झुकलेली होती. हळूच ती मान वर करत,पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवत, बोळकं झालेल्या तोंडावर उगीचच मुलासारखं निरागस हसू आणत, अजून थोडस जवळ येत, नजरेत बघत म्हातारा परत थोडासा क्षीण आवाजात म्हणाला "पोरा धा रुपय दि रं,जरा एस. टि. च्या टिकटाला कमी पडत्यात." अंगात बंडी, धोतर, टोपी अगदी स्वच्छ धुऊन नीळ दिलेली. गळ्यात तपकिरी रंगाची मफलर,हातात लाल रंगाची काठी ,पायात एका बंधाची अंगठा शिवलेली लखानी ची चप्पल, उतारवयामुळे सुरकुत्या पडलेलं शरीर लटपटत होत, म्हाताऱ्याकडे पाहून वाटत नव्हतं कि तो भिखारी आहे किंवा त्याच्याकडे एस टि च्या तिकिटाएवढेही पैसे नसावेत. मी म्हणालो "काय बाबा एवढे टापटीप राहता आणि तिकिटाला पैसे नाहीत म्हणून सांगता पटत का तुम्हाला हे." ...
Posts
Showing posts from February, 2018
- Get link
- X
- Other Apps
न कळणारी तू.... मला अजूनही कळले नाही की तू कशी आहेस,मला वाटते तशी आहेस की भास आहेस, कळत नाही मला तुझ्यावर प्रेम करावं कि नाही. अस वाटत तुला आठवतं राहावं, सगळं जग लिप्त व्हावं, मला नाही कळत तुझ्याविषयी असं का वाटते. कि तू फक्त माझ्यासाठीच आहे,का मला असं कायम वाटत कि सारे लोक आपल्या दोघांचे बंध जुळवून देण्याचा प्रयत्न करतायेत . ते काहीही असो कितीतरी मुली कितीतरी वेळा माझ्या मनात रुतल्या,त्यांचे व्रण अजूनही आहेत काळजात. पण तुला जेंव्हापासून पाहिलंय तू माझ्या मनाचा अविभाज्य भाग बनली आहेस. कितीही प्रयत्न केला तुला दूर लोटण्याचा ,मनाला समजावण्याचा , तुझ्याविषयी काहीतरी खुराफत काढून तुला बाकीच्या मुलींसारखं बाजूला ढकलण्याचा पण नाही जमत आहे मला, का काही माहित नाही. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझं ते हास्य अजून काळजाला गुदगुल्या करतंय. नंतर सतत तुझ्याविषयी विचार आणि कोणी भेटला कि तुझं वेड लागल्यासारखं तुझी माहिती मिळवण्याचा प्रयत्न. माहित नाही हे कितपत बरोबर कि चूक आणि मला हे हि माहित नाही कि तु...
- Get link
- X
- Other Apps
साक्षीदार रात्री तासन तास फोन वर तू गप्पा मारत बसायचीस, मी तुझ्या शेजारच्या घराच्या बाल्कनीत बसून ऐकत बसायचो , ... तुझ्या गप्पा नाही गं तुझा आवाज . गप्पा मारायच्या भरात तुला कळत नव्हतं तू किती आनंदी व्हायचीस, रुसायचीस , रागवायचीस . पण मला ते खूप सुखावून जाणार होतं. मला काही देणं-घेणं नव्हतं, तू कोणासोबत बोलतेस? का बोलतेस? किती वेळ बोलतेस? पण मला तुझा आवाज गुंतवून ठेवायचा तुझ्या नादात. तुझा नीटसा चेहरा हि दिसत नव्हता रात्रीच्या वेळी, आणि मलाही तो चेहरा पहावाच असं कधी वाटलं नाही. एवढ्या दिवस शेजारी राहून कधी ओळख हि नाही झाली आपली, का मलाच करायची नव्हती काय माहित? आता तुझ्या आवाजाची आठवण त्रास देते, तू म्हणशील त्यात माझा काय दोष? कधी आलीस परत तर विचार त्या आपल्या दोघांमध्ये आडव्या येणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या पानांना, तुझ्या आवाजाने कदाचित ते शहारतील. तरी...