न कळणारी तू....
मला अजूनही कळले नाही की तू कशी आहेस,मला वाटते तशी आहेस की भास आहेस, कळत नाही मला तुझ्यावर प्रेम करावं कि नाही.
अस वाटत तुला आठवतं राहावं, सगळं जग लिप्त व्हावं, मला नाही कळत तुझ्याविषयी असं का वाटते. कि तू फक्त माझ्यासाठीच आहे,का मला असं कायम वाटत कि सारे लोक आपल्या दोघांचे बंध जुळवून देण्याचा प्रयत्न करतायेत .
ते काहीही असो कितीतरी मुली कितीतरी वेळा माझ्या मनात रुतल्या,त्यांचे व्रण अजूनही आहेत काळजात. पण तुला जेंव्हापासून पाहिलंय तू माझ्या मनाचा अविभाज्य भाग बनली आहेस.
कितीही प्रयत्न केला तुला दूर लोटण्याचा ,मनाला समजावण्याचा , तुझ्याविषयी काहीतरी खुराफत काढून तुला बाकीच्या मुलींसारखं बाजूला ढकलण्याचा पण नाही जमत आहे मला, का काही माहित नाही.
तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझं ते हास्य अजून काळजाला गुदगुल्या करतंय.
नंतर सतत तुझ्याविषयी विचार आणि कोणी भेटला कि तुझं वेड लागल्यासारखं तुझी माहिती मिळवण्याचा प्रयत्न.
माहित नाही हे कितपत बरोबर कि चूक आणि मला हे हि माहित नाही कि तुला माझ्याविषयी काही वाटत कि नाही, कि माझ्याच मानाने रंगवलेलं स्वप्न, बांधलेला ताजमहाल.
वर्षातून एकदा -दोनदा तू मला दिसतेस आणि तुझं ते रूप वर्षभर गुलाबाच्या फुललेल्या ताज्या फुलाप्रमाणे मनात मला हसवत, तुझ्यावर प्रेम करायला लावत, शंभरदा समजावून हि न ऐकणारं मन आणि त्याच्या तालावर नाचणारा मी.
कधीतरी वाटत तुझ्याबरोबर खूप बोलावं, तुझं मन वाचून टाकावं, तुझ्या रुबाबदार डोळ्यांचा तीर मुद्दामहून काळजात घुसवून घ्यावा, तुझ्यासाठी सर्व काही करावं,तुला माझी राणी बनवावं.
मग भानावर येताच आठवतो समाज आणि त्यातली माझ्यावर नजर ठेऊन असणारे डोळे.
का मन खेळत एकटच स्वतः नादात, याच उत्तर न कळणारी तूच देऊ शकतेस.
प्राणा.....
खूप सुंदर कविता..... Heart touching words..... साहेब अप्रतिम😍😘
ReplyDeleteखूपच छान 👌👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGood Pranav
ReplyDelete