Posts

Showing posts from May, 2018
जत्रा        वाऱ्याच्या झुळकेबरोबरच कडक उन्हाच्या अंगाला लागणाऱ्या आणि डोंगरउतारावर डोळ्यांना दिसणाऱ्या झळाया, हिरव्या, पिवळ्या, काळ्या, निळ्या रंगाच्या ताडपत्र्या ठोकून बांधलेली पालं. डोंगराच्या माथ्यापासून तर मंदिराच्या अलीकडं १०० एक फूट जिथं झाडाची सावली भेटलं तिथं तीन दगडाच्या चुली मांडून बोकड कापायच्या रासी लावून जत्रा चालू होत्या. जत्रा खाणाऱ्यांची होती आणि न खाणाऱ्यांची पण होती, पुढं गेलं कि खेळण्याचे, चष्म्याचे, टोप्याचे, कडेवाले, कानातले, बांगड्यांचे दुकान थाटलेली दोन-तीन दिवसापासून जत्रेत धंदा करण्यासाठी आलेले बिना अंघोळीचे, देवाच्या प्रसादावर, वडापाव, भज्यावर दिवस काढणारे व्यावसायिक, तिकडूनच पुढे आकाश पाळणा, रिंगण, लाकडी स्वयंपाक उपयोगी साहित्य या सगळ्याच्या बरोबर बसलेला जत्रेचा मानकरी भैरोबा. "भैरोबाच्या नावानं चांगभलं" च्या घोषाने सर्व जत्रा दुमदुमून गेली होती.        जत्रेत भोळे भक्त, नवसवाले भक्त, डोकं टेकवायला आलेले भक्त, काही नुसतेच याला त्याला बघायला आलेले भक्त पण या सगळ्यात हौसा जरा वेगळीच होती.      ...