अबोल... अबोल ती, नायनातून दुथडी भरून पूर यावा अशी बोलायची. लाख वेळा ओठांवरती आलेलं, मनामध्ये साठलेल, डोळ्यांसवे दाखवायची पण ती अबोल. अबोल ती साद घालायची सख्याला लपून छपून, एकटक ऐकवायची त्याला कधी ओठांबाहेर न पडू दिलेलं हसू, न तो बोलला न ती बोलली ती मी आहे. शेवटी अबोल दोघेही शांत पसरलेल्या समुद्रासारखे, वाट पाहत सख्याची नाव घेऊन येण्याची. पण धीर होत नाही लाटांचा आवाज करायचा, त्सुनामी आणून त्या सख्याला आपल्या सोबत स्वार करण्याचा, म्हणून ती अजूनही अबोल.… .....प्राणा
Posts
Showing posts from September, 2018