अबोल...
 
  अबोल ती, नायनातून दुथडी भरून पूर यावा अशी बोलायची.
लाख वेळा ओठांवरती आलेलं, मनामध्ये साठलेल, डोळ्यांसवे दाखवायची पण ती अबोल.
अबोल ती साद घालायची सख्याला लपून छपून, एकटक ऐकवायची त्याला  कधी ओठांबाहेर न पडू दिलेलं हसू,
न तो बोलला न ती बोलली ती मी आहे.
शेवटी अबोल दोघेही शांत पसरलेल्या समुद्रासारखे, वाट पाहत सख्याची नाव घेऊन येण्याची.
पण धीर होत नाही लाटांचा आवाज करायचा, त्सुनामी आणून त्या सख्याला आपल्या सोबत स्वार करण्याचा,
म्हणून ती अजूनही अबोल.…
                                             .....प्राणा

Comments

  1. रोकड़े साहेब तुमच्या कवितेची एक खासियत आहे ... प्रथमदर्शनी सोपी वाटते परंतु नंतर परत वाचली की अर्थाची आणि त्या मागच्या भावनेची खोली कळते.....👍👌 खुप सूंदर ....

    ReplyDelete
  2. This blog touches feelings ..Mr.rokde made this blog alive👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जेंव्हा माणसाला जाग येईल

मंजुळा

तू..