Posts

Showing posts from October, 2018

स्वार्थ

                                 2.परिचय मी दोन दिवस झाले वाट बघतीये. पाय मुरगळवला त्या दिवशी माझं आवडत कानातल तिकडे टाकलं होतं. तो एकतर घाबरला होता, त्याने पाहिलं की नाही काय माहीत पण पाहिलं असत तर बोलला असता म्हणजे त्याने कानातले पाहिलं नाही वाटत. मैत्रिणी सोबत असते म्हणून बोलत नसेल, आज जरा उशिरा जाते पण बोलायचं काय? हा... कानातले सापडलं का नाही thank you ते तर बोलून झालं, मग कानातले मिळाल का हे fix विचारायचं. भाई आज नाही तो फिर कभी नही. दोन दिवसात साधं चार शब्द बोलायची हिम्मत नाही करू शकलो . आज विचारतोच हे कानातले तुझं आहे का? नाही नको तिचच आहे हे कशावरून, हे कानातले इकडे पडलं होत हे तुझं आहे का? हे ok राहील, पण एवढं सगळं बोलायचं म्हणजे practice करावी लागेल बोलायची. पण काही म्हणा कानातल एकदम नाजूक आहे अगदी तिच्यासारखं, हळव्या मनाची वाटते, मला हळव्या मनाची माणस खूप आवडतात लवकर attachment होते. ती लांबून जरी दिसली तरी मन धडधडायला लागत. रात्र दिवस तीच स्वप्नात असते. भाऊ यालाच प्रेम म्हणतात. तो- e...