स्वार्थ

                                 2.परिचय
मी दोन दिवस झाले वाट बघतीये. पाय मुरगळवला त्या दिवशी माझं आवडत कानातल तिकडे टाकलं होतं. तो एकतर घाबरला होता, त्याने पाहिलं की नाही काय माहीत पण पाहिलं असत तर बोलला असता म्हणजे त्याने कानातले पाहिलं नाही वाटत. मैत्रिणी सोबत असते म्हणून बोलत नसेल, आज जरा उशिरा जाते पण बोलायचं काय? हा... कानातले सापडलं का नाही thank you ते तर बोलून झालं, मग कानातले मिळाल का हे fix विचारायचं.

भाई आज नाही तो फिर कभी नही. दोन दिवसात साधं चार शब्द बोलायची हिम्मत नाही करू शकलो . आज विचारतोच हे कानातले तुझं आहे का? नाही नको तिचच आहे हे कशावरून, हे कानातले इकडे पडलं होत हे तुझं आहे का? हे ok राहील, पण एवढं सगळं बोलायचं म्हणजे practice करावी लागेल बोलायची.
पण काही म्हणा कानातल एकदम नाजूक आहे अगदी तिच्यासारखं, हळव्या मनाची वाटते, मला हळव्या मनाची माणस खूप आवडतात लवकर attachment होते. ती लांबून जरी दिसली तरी मन धडधडायला लागत. रात्र दिवस तीच स्वप्नात असते. भाऊ यालाच प्रेम म्हणतात.

तो- excuse me
ती- हां...
तो- ते तुझं कानातल.. म्हणजे तुझं आहे का?
ती- अरे हो.... मला वाटलं हरवलं.... thank you so much... माझं favourite आहे...
तो- त्यात काय thank you... मला वाटलं च होत की हे तुझं असेल म्हणून.
ती- तू great आहेस, तुझं नाव काय आहे?
तो- हिमांशू जाधव.. आणि तुझं
ती- स्मिता... स्मिता नवले.... बर thank u परत एकदा.
तो- परत परत नको म्हणू त्यात काय एवढं, बर चल bye.
ती- bye

काय हसली हे ती, भाऊ आता पहिल्यांदा fb वर search करा आणि request send करा. आणि जर request accept झाली तर तिच्या मनात आहे.

किती साधा आहे तो, निरागस. आता fb वर पाहावं लागेल त्यानी नाही पाठवली तर मला पाठवावी लागेल.
                                                      क्रमशः...
निव्वळ तिच्या कानातल्या वरून तिचा स्वभावाचा अंदाज लावणे, किंवा त्याच्या बोलण्यावरून तो कसा आहे हे ठरवणे. म्हणजे तुमच्या मनात एक प्रतिमा तयार आहे फक्त आता त्या प्रतिमेला एक चेहरा मिळाला म्हणजे तुम्ही तो मिळवला आणि यालाच तुम्ही प्रेम म्हणताय,  मला एकच कळाल नाही    दोघांनाही एकमेकांशी ओळख करावी च अस का वाटलं? तुम्ही दोघे ही एकमेकांना बघता इथपर्यंत ठीक होत, प्रेम असलेल्या माणसाची काळजी वाटते पण ती कशी आहे हे पाहून कळतच. अगोदर तुम्हाला एकमेकांना पाहिलं तरी जमत होत पण मनाची अपेक्षा वाढली बोलू वाटलं, मैत्री करू वाटली अपेक्षा वाढली हाच तुमचा स्वार्थ आहे.

 प्रेम होण्यासाठी बोललं नाही तरी जमत पण प्रेम वाढवण्यासाठी बोलणं, मैत्री करण गरजेचं असत.
बरं..
                                                       प्राणा....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जेंव्हा माणसाला जाग येईल

हसणं