स्वार्थ
३. संवाद नावं माहित झाली होती. एक क्षणही वेळ वाया न घालवता fb वर searching ला लागलो. हृदयाची नुसती धडधड चालली होती. तिच्यासोबत पुन्हा एकदा बोलल्यावर माझं मन थंड हवेसोबत उडत होत. तिच्या नावाच्या fb वर भरपूर जणी होत्या. तिने स्वतः चा profile picture हि ठेवला नव्हता आणि privacy हि only me होती. यात नेमका तिला ओळखावं कस? खूप चाचपून तिच्या नावाच्या तीन जणींना request send केली. त्याच्या request ची वाट च पाहत होते, नाहीतर मीच पाठवणार होते म्हणा. request accept केल्यावर तो काही hii , hello म्हणायच्या ऐवजी "माझ्या घराशेजारी असलेल्या बाकड्याजवळ तुमचा पाय मुरगळला होता का? तुम्ही तिथूनच कॉलेज ला जात का?" मला काही कळलं नाही त्याला म्हणाले "हो... पण तू अस का विचारतोय?" "त्या तुझ्या नावाच्या तीन मुलीं पैकी दुसरीसोबतच chatting सुरु झाली असती मग म्हणून हि उलट तपासणी." मला हसू हि येत होत आणि प्रेम हि, त्याच्या त्या ...