स्वार्थ
३. संवाद
नावं माहित झाली होती. एक क्षणही वेळ वाया न घालवता fb वर searching ला लागलो. हृदयाची नुसती धडधड चालली होती. तिच्यासोबत पुन्हा एकदा बोलल्यावर माझं मन थंड हवेसोबत उडत होत. तिच्या नावाच्या fb वर भरपूर जणी होत्या. तिने स्वतः चा profile picture हि ठेवला नव्हता आणि privacy हि only me होती. यात नेमका तिला ओळखावं कस? खूप चाचपून तिच्या नावाच्या तीन जणींना request send केली.
त्याच्या request ची वाट च पाहत होते, नाहीतर मीच पाठवणार होते म्हणा. request accept केल्यावर तो काही hii , hello म्हणायच्या ऐवजी "माझ्या घराशेजारी असलेल्या बाकड्याजवळ तुमचा पाय मुरगळला होता का? तुम्ही तिथूनच कॉलेज ला जात का?" मला काही कळलं नाही त्याला म्हणाले "हो... पण तू अस का विचारतोय?" "त्या तुझ्या नावाच्या तीन मुलीं पैकी दुसरीसोबतच chatting सुरु झाली असती मग म्हणून हि उलट तपासणी." मला हसू हि येत होत आणि प्रेम हि, त्याच्या त्या निरागस आणि सरळ स्वभावावर. पण तो खरंच दुसऱ्याच मुली सोबत बोलायला लागला असता तर... पण जाऊद्या तो विचार करायचा हि वेळच नव्हती.
आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीसोबत प्रियसी च्या नात्याने बोलत होतो. हृदयाची धडधड काही केल्या थांबत नव्हती. काय बोलावं काळत नव्हतं. मीच काहीतरी विषय काढून बोलायचो. "मग कस चाललंय कॉलेज, किती वाजता भरत- सुटत, किती lecture असतात, जेवण केंव्हा करतेस?" पण तिच्याकडून फक्त " मस्त , ७ वाजता , ११ वाजता, ३ lectures, जेवण घरी गेल्यावर." अशीच उत्तर यायची मला वाटायचं तिने भरभर बोलावं खूप वेळ typing चा symbol दिसायचा messenger वर आणि फक्त एक-दोन शब्द बोलायची . लाजत असेल, नाहीतर धीर होत नसेल. मीच इकडे १०-१० वेळा तिला काय वाटेल याचा विचार करून बोलतोय.
आज काहीतरी वेगळाच feeling होत. त्याच्या सोबत काय बोलावं कळत नव्हतं पण त्याचा माझ्याशी आता संवाद सुरु झालाय हा आनंदच गगनात मावत नव्हता. दिवस तर कसा निघून गेला कळलंच नाही. रात्रभर त्याच्या विचारात मी जागीच होते , chatting नव्हते करत पण मनातल्या त्या "ओ पिया ओ पिया लेके डोली आ" या फाल्गुनीच्या गाण्यावर मी स्वप्न रंगवत होते, सकाळ होण्याची वाट पाहत.
क्रमश ...
या अगोदरही तुम्ही अनोळखी मुला किंवा मुलीशी हेतुपरत्वे बोलला असाल नंतर तो तुमचा मित्र / मैत्रीण झाला असेल. मग ह्या मुला/ मुली सोबत अस वेगळं काय झालं कि तिच्यासोबत बोलल्यावर तुम्हाला प्रेम झाल अस तुम्ही म्हणता. पुढे जाऊन तुम्ही एकमेकांना कळल्यावर प्रेम होईलही, टिकेल हि किंवा होणार हि नाही, टिकणार हि नाही. पण हे आत्ता जे चालू आहे त्याच काय? एखादी गोष्ट मनाला हवीशी वाटली आणि ती मिळाली कि प्रत्येक जण हुरळून जातोच. मग त्यात भर म्हणून तुमचा ओसंडून वाहणारा उत्साह.
तुमच पुढे जाऊन होणाऱ्या प्रेम किंवा ब्रेक अप हे आताच्या तुमच्या मनातल्या स्वार्थापासून आहे.
प्राणा ...
Comments
Post a Comment