स्वार्थ
4. सवय गप्पा दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या, FB वरून आता INSTA., WHATSAPP , कॉल्स असं सगळं एकदम सुंदर आणि एकमेकांच्या सहवासात आयुष्य सगळं बहरून गेलं होत. हिमांशू - कस सांगावं तिला, तिला तर सगळं च माहित आहे म्हणा कि माझं तिच्यावर प्रेम आहे. आज काल तिच्याशिवाय दिवस सुरूही होत नाही आणि संपत हि नाही. ती जर नाही म्हणाली तर, मला फक्त तुझ्याबरोबर मैत्री ठेवायची आहे बाकी काही नाही असं म्हणाली तर... कस सांगावं काळत नाहीये. स्मिता - तो एवढा साधा आहे ना, त्याचा प्रत्येक शब्द न शब्द ऐकत राहावं वाटत, तासनतास बोलत बसावसं वाटत. हे प्रेम च आहे, पण त्याला सांगू कि नको किंवा त्याने स्वतः हुन सांगितलं तर... हिमांशू - एक विचार असा येतो कि सांगून टाकावं जे काही मनात आहे ते. ...