स्वार्थ

4. सवय 

गप्पा दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या, FB वरून आता INSTA., WHATSAPP , कॉल्स  असं सगळं एकदम सुंदर आणि एकमेकांच्या सहवासात आयुष्य सगळं बहरून गेलं होत. 

हिमांशू  - कस सांगावं तिला, तिला तर सगळं च माहित आहे म्हणा कि माझं तिच्यावर प्रेम आहे. 
              आज काल तिच्याशिवाय दिवस सुरूही  होत नाही आणि संपत हि नाही. ती जर नाही म्हणाली तर,
             मला फक्त तुझ्याबरोबर मैत्री ठेवायची आहे बाकी काही नाही असं म्हणाली तर...
             कस सांगावं काळत नाहीये. 

स्मिता - तो एवढा साधा आहे ना, त्याचा प्रत्येक शब्द न शब्द ऐकत राहावं वाटत,
            तासनतास  बोलत बसावसं वाटत. हे प्रेम च आहे,
            पण त्याला सांगू कि नको किंवा त्याने स्वतः हुन सांगितलं तर... 

हिमांशू - एक विचार असा येतो कि सांगून टाकावं जे काही मनात आहे ते.
             नंतर परत विचार येतो ती जर नाही म्हणाली तर.
             नाही - नाही अस कसं एकदा तिने whatsapp  मला सांगण्याचा प्रयत्न केला होता.
             love emojiपाठवून लगेच  delet केले.
             मी विचारलं तर म्हणाली काही नाही सहज चुकून msg  तुला forward झाला.
             पण मी yo - whatsapp वापरतो हे तिला माहित नाही. 

            " ऐक ना उद्या थोडीशी उशिरा जाशील का कॉलेज ला, एक पुस्तक तुला द्यायचं होत.
            मी वाचलय एवढे  छान पुस्तक मी आज पर्यंत वाचल  नव्हतं म्हणून म्हणलं तुला हि वाचायला द्यावं." 

स्मिता - " हो ठीक आहे पण आज अचानक असं पुस्तक वैगेरे ... "

हिमांशू - " अरे पुस्तक हेच आपले खरे मित्र असतात.
                जीवनात  प्रगती  कशी करायची हे पुस्तकचं शिकवू  शकतात बाकी कोणी नाही. "

स्मिता - " चालेल मी येताना दिसले कि मग ठेव तिथे बाकड्यावर पुस्तक, नाहीतर मला यायच्या
              अगोदर दुसरच कोणी उचलून न्यायचं. "
              पुस्तक घेतलं कॉलेज मधून घरी आल्यावर पाहिलं तर त्यात त्याने पत्र लिहून पाठवलं होत.
              जस - जस  पत्र वाचत होते  तस - तसा माझा आनंद गगनात मावत नव्हता,
            अंगावर आलेले शहारे हि मनातल्या  मनात लाजून चूर झाले होते.
             घाबरत घाबरत का होईना त्याने प्रेम व्यक्त केलच. 

हिमांशू - आता रात्र व्हायला आली, तिने पत्रही वाचाल असेल, मग ती online का येत नाहीये.
             तिला राग तर आला नसेल ना, कि मी prapose करायला घाई केली,
            आहे ते नातं पण block  व्हायच्या अगोदर  सरळ - सरळ माफी मागतो तिची.

            " तुला पत्र मिळालं  असेल आणि ते तू वाचलंही असेल, i m really really sry,
              तुला त्याचा राग आला असेल तर, ते मी भावनेच्या भरात काहीतरी च लिहून पाठवलं,
             माझं असा काही नाहीये मनात आपण चांगले मित्र राहुयात कायम."

स्मिता -  त्याला कसं सांगावं कि माझाही त्याच्यावर प्रेम आहे, msg करायची तर राहूदे.
             internet चालू करायचं म्हणल तरी मनात धड-धड होतीये. 

हिमांशू -  शेवटी तिचा रात्री १२ वाजता msg आला,
              " राग वैगेरे तस काही नाहीये  रे, मला पण आता पूर्ण विश्वास बसलाय कि आपण पुस्तकांमुळेच 
               जीवनात पुढे प्रगती करू शकतो आणि मला जीवनात अशीच तूझ्यासोबत  प्रगती करायचीये ."

              नाचावं कि उड्या  माराव्यात कि जोर जोरात ओरडाव,
             आनंदाच्या भरात काय करावं आणि काय नाही अस झालयं. 

                                                                                    क्रमश ... 

एखादी सवय चांगली असते, एखादी वाईट. वाईट सवयींना व्यसन म्हणतात तस हे तुमचं व्यसन झालंय.  
तुम्हाला एकमेकांबरोबर बोलायचं व्यसन लागलंय यात प्रेम कुठे आहे ?
तुम्ही फक्त ह्या तुमच्या बोलण्याच्या व्यसनाला प्रेम अस नाव ठेवलंय.
जे कि तुम्हाला लागलेली सवय त्या नावाखाली कायम पुरवत राहील. 

                                                                                     प्राणा... 

Comments

Popular posts from this blog

जेंव्हा माणसाला जाग येईल

मंजुळा

तू..