स्वार्थ
1. ओळख हृदयाची धडधड, शरीराची थरथर आणि आलेला शहारा, त्यात तिचा हात हातात. त्या रस्त्यावरच्या खड्याच कधी नव्हे ते आज खूप कौतुक वाटत होत. तो नसता तर तिचा पाय मुरगळला कसा असता आणि मला तिचा हात हातात कसा घेता आला असता. काळजी ही वाटत होती म्हणा तिची, तिचा दुखवलेला चेहरा बघवत नव्हता. तो दररोजचा मैत्रिणी सोबत कॉलेज मध्ये जातानाचा हळूच माझ्याकडे तिरकस बघणारा गोड चेहरा बघायची सवय झाली होती ना. आणि तो बाकडा दररोज राग यायचा त्याचा कारण कॉलोनी तली म्हातारी तिथं येऊन किती तरी वेळ गप्पा मारत बसायची म्हणजे तस म्हाताऱ्यांचं काही नाही बरका पण नेमकी हिरवळ यायची वेळ आणि ते तिथे बसायची वेळ एकच असायची, पण आज त्या बाकड्याचे आभार मानावे तेवढे कमी आहे, इतक्या दिवस वाटायचं कशाला ठेवलाय बाकडा इथे पण आज अचानक तिला घेऊन तिथे बसलो ना तेंव्हा त्याच महत्व मला कळाल...