स्वार्थ
( नमस्कार मित्रांनो, साहित्यातील नवीन प्रकार लघु प्रेम कथा हा प्रकार लिहण्याचा मी प्रयत्न करत आहे, कदाचित त्याच्यात माझ्याकडून काव्य, कधी दीर्घ कथा येऊ शकतात. प्रेमाच्या कथांची मालिका सुरु करीत आहे, त्याचा मसुदा सादर करीत आहे, तरी आपल्या सूचना, अभिप्राय मला comment box मध्ये कळवा.)
' आज काल खर प्रेम उरल च नाही.'
' खर प्रेम होतं कुठे उरायला. खरं सांगा जे झालं ते प्रेम होतं की स्वार्थ होता.'
' काही काय बोलतो तू, तिला पाहता क्षणी मी तिच्या/ त्याच्या त गुंतलो, जेंव्हा मी तिला/ त्याला पाहिलं ना तेंव्हा ती एका आजीला रस्ता ओलांडून देत होती त्यामुळे ती/ तो मला आवडली. '
'अशी एक ना अनेक कारणं आहेत तुमच्या कडे, पण मला तुम्हाला विचारायचय तुम्ही तरुण झाल्यापासून पाहता क्षणी आवडनारी ती एकटीच होती का? आजीला रास्ता ओलांडून देताना याअगोदर तुम्ही कोणत्या मुली ला पाहिलं नव्हतं का? असे एक ना अनेक कारणांमध्ये फक्त तीच होती का पहिली ? एक सांगू जेंव्हा तुमचं मन म्हणाल आता एखादी प्रियसी आपल्याला असावी इतर जे करतात तसच आपण ही एखाद्या मुली सोबत हळू आवाजात हसत, रडत बोलावं, आपल्या आयुष्याचा साथीदार आपल्या ओळखीचा असावा किंवा काही नसली तरी आपली वासना. असा काही तरी हेतू जेंव्हा मनात ठेवला जातो, त्यावेळी आपल्या मनाला हेतू पुरवणारी प्रत्येक गोष्ट सुंदर च वाटते. मग हा हेतू ठेवण स्वार्थ नाही तर दुसर काय आहे.'
'गप रे काही पण काय बोलतो, अरे ते प्रेम आहे ते होत आपोआप आणि जरी थोडा सा असला हेतू तरी काय फरक पडतो.'
'काही वर्षांनी तुमचे आई वडील तुमच्या लग्नासाठी मुलगा/मुलगी बघणारच आहेत, मग हे तुमचे थोडेसे हेतू लग्ना नंतर ही पूर्ण होऊ शकतात की.'
'अरे पण लग्नाच्या अगोदर जे प्रियसी सोबतच जे लपत छपत, जगण असत ना ते काही वेगळंच असत.'
हा असं आहे तर पण ते वेगळंच जगण जगायची जी तुमची इच्छा आहे. तो एक स्वार्थाचा प्रकारचं नाही का हो !'
'तू अजून प्रेम केलं नाही तुला ते कळणार नाही.'
'ठीक आहे तुम्ही केलेलं प्रेम मी माझ्या शब्दात मांडतो, मग तुमच त्यात किती प्रेम सापडत आणि किती स्वार्थ ते पाहू '.....
.... क्रमश:
.... प्राणा
👌👌👌👌wa
ReplyDeleteNice
ReplyDeleteSahi Hain Boss
ReplyDelete