स्वार्थ

                                                               1. ओळख
हृदयाची धडधड, शरीराची थरथर आणि आलेला शहारा, त्यात तिचा हात हातात. त्या रस्त्यावरच्या खड्याच कधी नव्हे ते आज खूप कौतुक वाटत होत.  तो नसता तर तिचा पाय मुरगळला कसा असता आणि मला तिचा हात हातात कसा घेता आला असता.  काळजी ही वाटत होती म्हणा तिची, तिचा दुखवलेला चेहरा बघवत नव्हता.  तो दररोजचा मैत्रिणी सोबत कॉलेज मध्ये जातानाचा हळूच माझ्याकडे तिरकस बघणारा गोड चेहरा बघायची सवय झाली होती ना. आणि तो बाकडा दररोज राग यायचा त्याचा कारण कॉलोनी तली म्हातारी तिथं येऊन किती तरी वेळ गप्पा मारत बसायची म्हणजे तस म्हाताऱ्यांचं काही नाही बरका पण नेमकी हिरवळ यायची वेळ आणि ते तिथे बसायची वेळ एकच असायची, पण आज त्या बाकड्याचे आभार मानावे तेवढे कमी आहे, इतक्या दिवस वाटायचं कशाला ठेवलाय बाकडा इथे पण आज अचानक तिला घेऊन  तिथे बसलो ना तेंव्हा त्याच महत्व मला कळालं .

तो:- जास्त दुखतय का, पाणी आणू का, की तुला सोडवू घरी?

ती:- नाही नको ठीक आहे मी आता, जाईल मी घरी..
.
.
Thank u हं..

तो:- अरे.. अं.. उम..
.
व.. welcome, mention not.

जाताना त्याच्या कडे बघून दिलेल्या smile वरून तरी आता त्याला कळायला हवं माझ्या मनातलं.  आणि किती घाबरट आहे तो, थरथरत होता, दोन मिनिट हात हातात होता आणि नंतर अडखळत विचारतोय बर आहे का म्हणून, मला वाटलं होतं स्टोरी नाव विचारण्या पर्यंत जाईल पण काय..
दररोज बघतो माझ्याकडे सकाळी कॉलेज ला जाताना मुद्दामहून काही तरी काम काढून येतो पाहायला, मी ही पाहते म्हणा त्याच्या कडे मला ही आवडायला लागलाय तो.  दररोज रस्त्यावर लोकांची ये जा त्यात मैत्रिणी सोबत त्यामुळे कदाचित घाबरत असेल बोलायला म्हणून आज रविवार निवडला, गर्दी कमी असते ना   रस्त्यावर आणि कॉलेज ला हि सुट्टी त्यामुळे सोबत मैत्रिणी नाहीत.  मला माहित होतं तो ठरलेल्या वेळी मला पाहण्यासाठी येणार जरी सुट्टी असली तरी कारण त्याला माहित असणार मीही येणार ते. तो आला.. त्याला पाहून मुद्दामहून पाय मुरगळलवला, डोळ्यात पाणी आणलं. तर त्याच काय तर बरं आहे का !! अरे काहीतरी बोलायचं ना त्याने पुढे.  कस काय FRIENDSHIP  करता येईल त्यालाच माहीत.
                                                                                                                  क्रमशः.... 

तू तर म्हणलास प्रेम म्हणजे विश्वास,काळजी  वैगेरे वैगेरे  पण यात कुठं ते सगळं. म्हणजे तू तिला नुसताच पाहायचास प्रेम नव्हतं.
अरे ही प्रेमाची पहिली step आहे रे आधी एकमेकांना आवडाव लागत मग पुढं ते सगळं असत विश्वास काळजी etc.
तू तर म्हणाला होतास की प्रेम आपोआप होत.  हां...याचा अर्थ प्रेम आपोआप होत नाही, ते एकतर घडवलं जात  किंवा जमवल जात दोघांच्या संमतीने. तुला अजून तीच नाव हि माहित नाही, आताशी कुठे पाहता तुम्हीं एकमेकांकडे त्यात कुठंय  प्रेम. आणि तूला  तीच नाही तर बाकड्यावर बसून बाकीच्या पण बघायच्या  असतात.
गप यार तू, ते मी असच  बघत असतो, पण मला  बाकीच्यांपेक्षा  ती खूपच आवडते. आणि पुढे बघ काय होत मग तुला कळेल प्रेम काय असत.
बरं... ठीक आहे पाहू ना.
                                                                                                                      ...प्राणा 

Comments

Popular posts from this blog

जेंव्हा माणसाला जाग येईल

मंजुळा

तू..