गुन्हा मला नव्हता गुन्हा करायचा तुझ्यात अडकण्याचा प्रिये... पण त्यावेळी मेंदू नाही मन निर्णय घेत होत. तुझं ते चांदण्यारात्रीतलं पहाटे गावातावर पडणाऱ्या दवबिंदूसारखं हसणं , ते टिपायच्या प्रयत्नात मी माझा एकटाच ते कोवळं दव पडण्याची वाट पाहत बसायचो. मला नाही कळालं तुझ्यात अडकण्याचा गुन्हा माझ्याकडून केंव्हा आणि कसा झाला. हा.... पण यात तुझा काही दोष नाही बरका प्रिये... तू तुझ्या निर्णयासाठी स्वतंत्र आहेस, आणि कायम नेहमीसारखं हसत- खेळत स्वतंत्र रहा. पण मी मात्र सततच्या तुझ्या विचाराने पारतंत्र्यात गेलोय. अंह.... यात हि तुझा काहीच दोष नाही, कारण तुझा विचारही मनच करायचं मेंदू नाही. तू म्हणशील कदाचित,असं काय झालं दोन दिवसात हा मागेच लागलाय. पण तुला निळ्या शुभ्र आकाशात विहंगम करायला मी कधीच आडवा येणार नाही, तेवढ्या हलक्या मेंदूचा मी नव्हे. पण गुन्हा मात्र झालाय आणि तो मनाने केलाय... ...
Posts
Showing posts from March, 2018
- Get link
- X
- Other Apps
प्रिया तुझे कुंतल कुरळे केस, जेंव्हा रेंगाळतात तुझ्या मानेवर , त्या सूर्या वरही काळ सावट येत प्रिये... तू चपळ कामिनी घाईत चालता, मंदशी झुळूक कोवळ्या आंबाच्या मोहराला स्वागतास पाठवते प्रिये... तुझं ते हसण , जणू खळखळणारा निर्मळ झरा प्रिये.. तुझ्या त्या हरणासारख्या डोळ्यांतील, खाली मान घालून जातानाचे निरस भाव, माझे ओठांपर्यंत आलेले शब्द आतच घोळवतात प्रिये ... तुझ्या असण्याची आणि येण्याची चाहूल, नकळत काळजाची धडधड वाढवते प्रिये... तुझी नाजूक काया आणि तुझं गच्चीवरून बघणं, दिवसाढवळ्या चांदणं पाडत प्रिये... सखये तुझ्या आठवणीत, विचारात रोज नव्याने तीळ-तीळ जगतोय, पण तुला कदाचित माहीतही नसेल प्रिये... - प्राणा...
- Get link
- X
- Other Apps
राणी तिचं मोठ्ठ कपाळ, धनुष्याच्या कमानीसारख्या भुवया, त्याच धनुष्याच्या दोरीला ताण देऊन मोठ्ठ करावं तेवढे टपोरे डोळे, त्याच धनुष्याला बाण लावावा तसं एकदम टोकदार आणि शेंड्याला फुगीर होणार नाक, तिचे बारीक नाजूक ओठ, निमुळता चेहरा, दोन फिकट लाल पडलेल्या गालावर बारीक-बारीक दोन-तीन तीळ, पाठीवर हेलकावणारी भुरकट रंगाची एकेरी वेणी, उंची पूरी, पुरेपूर स्त्रीत्व ल्यालेली, रंगानं तशी सावळीच,पण बघता क्षणी काळजाची धडधड वाढवणारी राणी. नेमक्या तारुण्याच्या वयात आई वारली. बापाने दुसरं लग्न केलं, मग काय राणी, राणीच झाली स्वतः च्या मनाची. नातेवाईकांमध्ये कोणी धीर देण्याच्या बहाण्याने जवळीक केली, नंतर त्याने सोडून दिल तेंव्हा राणी उदास झाली. पण काय माहित तिच्या मनाने तिला काय सांगितलं, नवीन-नवीन तिचे प्रेमप्रकरणं चोरून चालायचं पण नंतरची प्रेमप्रकरणे थोडक्यात लफडी खुलेआम व्हायची . आठवडा, पंधरा दिवस, महिना खूप झाला तिचा प्रियकर बदलायला. रस्त्याने, बाजारात...