गुन्हा 
मला नव्हता गुन्हा करायचा तुझ्यात अडकण्याचा प्रिये... 
पण त्यावेळी मेंदू नाही मन निर्णय घेत होत. 
तुझं ते चांदण्यारात्रीतलं पहाटे गावातावर पडणाऱ्या दवबिंदूसारखं  हसणं ,
ते टिपायच्या प्रयत्नात मी माझा एकटाच ते कोवळं दव पडण्याची वाट पाहत बसायचो. 
मला नाही कळालं तुझ्यात अडकण्याचा गुन्हा माझ्याकडून केंव्हा आणि कसा झाला. 
हा.... पण यात तुझा काही दोष नाही बरका प्रिये... 
तू तुझ्या निर्णयासाठी स्वतंत्र आहेस,
 आणि कायम नेहमीसारखं हसत- खेळत स्वतंत्र रहा. 
पण मी मात्र सततच्या तुझ्या विचाराने पारतंत्र्यात गेलोय. 
अंह.... यात हि तुझा  काहीच दोष नाही,
कारण तुझा विचारही मनच करायचं मेंदू नाही. 
तू म्हणशील कदाचित,असं काय झालं दोन दिवसात हा मागेच लागलाय. 
पण तुला निळ्या शुभ्र  आकाशात विहंगम करायला मी कधीच आडवा येणार नाही,
तेवढ्या हलक्या मेंदूचा मी नव्हे. 
पण गुन्हा मात्र झालाय आणि तो मनाने केलाय... 
                                                                           प्राणा...  

Comments

  1. परत एकदा खूप छान ........ M big fan of ur articles, poems ...... Keep it up bro 👍👏👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जेंव्हा माणसाला जाग येईल

मंजुळा

तू..