प्रिया
तुझे कुंतल कुरळे केस, जेंव्हा रेंगाळतात तुझ्या मानेवर ,
त्या सूर्या वरही काळ सावट येत प्रिये...
तू चपळ कामिनी घाईत चालता,
मंदशी झुळूक कोवळ्या आंबाच्या मोहराला स्वागतास पाठवते प्रिये...
तुझं ते हसण ,
जणू खळखळणारा निर्मळ झरा प्रिये..
तुझ्या त्या हरणासारख्या डोळ्यांतील, खाली मान घालून जातानाचे निरस भाव,
माझे ओठांपर्यंत आलेले शब्द आतच घोळवतात प्रिये ...
तुझ्या असण्याची आणि येण्याची चाहूल,
नकळत काळजाची धडधड वाढवते प्रिये...
तुझी नाजूक काया आणि तुझं गच्चीवरून बघणं,
दिवसाढवळ्या चांदणं पाडत प्रिये...
सखये तुझ्या आठवणीत, विचारात रोज नव्याने तीळ-तीळ जगतोय,
पण तुला कदाचित माहीतही नसेल प्रिये...
- प्राणा...
Comments
Post a Comment