जेंव्हा माणसाला जाग येईल निपचित, बेहोश, बेधुंद, पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धेच्या जीवनातून जेंव्हा माणसाला जाग येईल. तेंव्हा कळेल वर्षानुवर्ष न कळलेली नाती, भावनांची सरबत्ती आणि न उमगलेल प्रेम. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून, आपल्या ल कोणाचं काही घेणं देणं नाही म्हणणार तू, स्वतः साठी का होईना घेणं देणं नसणाऱ्यांची काळजी करशील. जेंव्हा तुला जाग येईल तेंव्हा रुग्ण नसतानाही तू एकमेकांची काळजी घेशील. तो काळ गेला आता जेंव्हा भगवान शंकर येऊन तू गटार केलेल्या गंगेला शिरावर घेतील, या वायुत पसरलेल विष पिऊन वायू शुद्ध करतील. हा खुळचट विचार सोडून दे. जेंव्हा तुला जाग येईल तेंव्हा पक्षी स्वच्छंद भराऱ्या घेत असतील शुद्ध हवेत. मोबाईल सारखं खेळणं बनवाव आणि त्या खेळण्याने आपल्यालाच त्याच खेळणं बनवाव, अगदी तसच पण जरा मोठा खेळ चालू आहे आत्ता, पण ह्या खेळात दाखवून द्यायचं य तुला की जगरहाटी कशी चलती ये, म्हणलं तर माणसांनी माणसांसाठी त्याच्या जीवन समृध्दी साठी चालवलेली कसरत. हे कळेल जेंव्हा तुला जाग येईल. नाहीतर भविष्यात ला बंदिवास अटळ आहे. ...
हसणं जणू संथ वाहणाऱ्या पाण्याच्या शांत लाटा. ते हसणं हळुवार हवे ने सळसळणाऱ्या पानांचा होणारा आवाज. ते हसणं सायंकाळच्या क्षितिजाच्या किरणांचा आणि दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्याचा मिलाप. ... ते हसणं इतकं निरागस की घरच्या गरिबीला आणि बाहेरच्या मुजोरी ला ही शरम येते. ते हसणं इतकं निखळ, वाट्याला आलेलं प्रत्येक दुःख निखळून नेत. ते हसणं एवढं नितळ, मनातल्या वेदना, उद्याची भ्रांत, वेड्यावाकड्या नजरा आरामात गढळून टाकत. तस हे हसणं लई रुबाबदार बरका पण सापडत रस्त्याच्या सिग्नल वर. हे हसणं निर्माण होत सडक निर्माण च्या कामावर. हे हसणं भटकत राहत डोंगरदऱ्यातून उद्याचा आसरा शोधत. ह्या हसण्याचा आदि आणि अंत असाच होतो बघ्यांकडे बघत आणि स्वतः ला माणूस म्हणून लपवत.. पिढ्यान् पिढ्या... प्राणा......
राणी तिचं मोठ्ठ कपाळ, धनुष्याच्या कमानीसारख्या भुवया, त्याच धनुष्याच्या दोरीला ताण देऊन मोठ्ठ करावं तेवढे टपोरे डोळे, त्याच धनुष्याला बाण लावावा तसं एकदम टोकदार आणि शेंड्याला फुगीर होणार नाक, तिचे बारीक नाजूक ओठ, निमुळता चेहरा, दोन फिकट लाल पडलेल्या गालावर बारीक-बारीक दोन-तीन तीळ, पाठीवर हेलकावणारी भुरकट रंगाची एकेरी वेणी, उंची पूरी, पुरेपूर स्त्रीत्व ल्यालेली, रंगानं तशी सावळीच,पण बघता क्षणी काळजाची धडधड वाढवणारी राणी. नेमक्या तारुण्याच्या वयात आई वारली. बापाने दुसरं लग्न केलं, मग काय राणी, राणीच झाली स्वतः च्या मनाची. नातेवाईकांमध्ये कोणी धीर देण्याच्या बहाण्याने जवळीक केली, नंतर त्याने सोडून दिल तेंव्हा राणी उदास झाली. पण काय माहित तिच्या मनाने तिला काय सांगितलं, नवीन-नवीन तिचे प्रेमप्रकरणं चोरून चालायचं पण नंतरची प्रेमप्रकरणे थोडक्यात लफडी खुलेआम व्हायची . आठवडा, पंधरा दिवस, महिना खूप झाला तिचा प्रियकर बदलायला. रस्त्याने, बाजारात...
Comments
Post a Comment