जेंव्हा माणसाला जाग येईल

जेंव्हा माणसाला जाग येईल

निपचित, बेहोश, बेधुंद, पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धेच्या जीवनातून जेंव्हा माणसाला जाग येईल.

तेंव्हा कळेल वर्षानुवर्ष न कळलेली नाती, भावनांची सरबत्ती आणि न उमगलेल प्रेम.

दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून,
आपल्या ल कोणाचं काही घेणं देणं नाही म्हणणार तू, स्वतः साठी का होईना घेणं देणं नसणाऱ्यांची काळजी करशील.
जेंव्हा तुला जाग येईल तेंव्हा रुग्ण नसतानाही तू एकमेकांची काळजी घेशील.

तो काळ गेला आता जेंव्हा भगवान शंकर येऊन तू गटार केलेल्या गंगेला शिरावर घेतील,
या वायुत पसरलेल विष पिऊन वायू शुद्ध करतील.
हा खुळचट विचार सोडून दे.
जेंव्हा तुला जाग येईल तेंव्हा पक्षी स्वच्छंद भराऱ्या घेत असतील शुद्ध हवेत.

मोबाईल सारखं खेळणं बनवाव आणि त्या खेळण्याने आपल्यालाच त्याच खेळणं बनवाव,
अगदी तसच पण जरा मोठा खेळ चालू आहे आत्ता,
पण ह्या खेळात दाखवून द्यायचं य  तुला की जगरहाटी कशी चलती ये,
म्हणलं तर माणसांनी माणसांसाठी त्याच्या जीवन समृध्दी साठी चालवलेली कसरत.
हे कळेल जेंव्हा तुला जाग येईल.

नाहीतर भविष्यात ला बंदिवास अटळ आहे.

                                              प्राणा....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मंजुळा

तू..