हसणं
हसणं जणू संथ वाहणाऱ्या पाण्याच्या शांत लाटा.
ते हसणं हळुवार हवे ने सळसळणाऱ्या पानांचा होणारा आवाज.
ते हसणं सायंकाळच्या क्षितिजाच्या किरणांचा आणि दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्याचा मिलाप.
...
ते हसणं इतकं निरागस की घरच्या गरिबीला आणि बाहेरच्या मुजोरी ला ही शरम येते.
ते हसणं इतकं निखळ, वाट्याला आलेलं प्रत्येक दुःख निखळून नेत.
ते हसणं एवढं नितळ, मनातल्या वेदना, उद्याची भ्रांत, वेड्यावाकड्या नजरा आरामात गढळून टाकत.
तस हे हसणं लई रुबाबदार बरका पण सापडत रस्त्याच्या सिग्नल वर.
हे हसणं निर्माण होत सडक निर्माण च्या कामावर.
हे हसणं भटकत राहत डोंगरदऱ्यातून उद्याचा आसरा शोधत.
ह्या हसण्याचा आदि आणि अंत असाच होतो बघ्यांकडे बघत आणि स्वतः ला माणूस म्हणून लपवत.. पिढ्यान् पिढ्या...
प्राणा......
Comments
Post a Comment