राणी तिचं मोठ्ठ कपाळ, धनुष्याच्या कमानीसारख्या भुवया, त्याच धनुष्याच्या दोरीला ताण देऊन मोठ्ठ करावं तेवढे टपोरे डोळे, त्याच धनुष्याला बाण लावावा तसं एकदम टोकदार आणि शेंड्याला फुगीर होणार नाक, तिचे बारीक नाजूक ओठ, निमुळता चेहरा, दोन फिकट लाल पडलेल्या गालावर बारीक-बारीक दोन-तीन तीळ, पाठीवर हेलकावणारी भुरकट रंगाची एकेरी वेणी, उंची पूरी, पुरेपूर स्त्रीत्व ल्यालेली, रंगानं तशी सावळीच,पण बघता क्षणी काळजाची धडधड वाढवणारी राणी. नेमक्या तारुण्याच्या वयात आई वारली. बापाने दुसरं लग्न केलं, मग काय राणी, राणीच झाली स्वतः च्या मनाची. नातेवाईकांमध्ये कोणी धीर देण्याच्या बहाण्याने जवळीक केली, नंतर त्याने सोडून दिल तेंव्हा राणी उदास झाली. पण काय माहित तिच्या मनाने तिला काय सांगितलं, नवीन-नवीन तिचे प्रेमप्रकरणं चोरून चालायचं पण नंतरची प्रेमप्रकरणे थोडक्यात लफडी खुलेआम व्हायची . आठवडा, पंधरा दिवस, महिना खूप झाला तिचा प्रियकर बदलायला. रस्त्याने, बाजारात...
Comments
Post a Comment