साक्षीदार  
   रात्री  तासन  तास फोन वर  तू   गप्पा   मारत  बसायचीस, 
मी तुझ्या शेजारच्या घराच्या बाल्कनीत बसून ऐकत बसायचो ,
... तुझ्या गप्पा नाही गं  तुझा आवाज . 
गप्पा मारायच्या भरात तुला कळत नव्हतं तू किती आनंदी व्हायचीस, रुसायचीस , रागवायचीस . 
पण मला ते खूप सुखावून जाणार होतं. 
मला काही देणं-घेणं नव्हतं, तू कोणासोबत बोलतेस? का बोलतेस? किती वेळ बोलतेस?
पण मला तुझा आवाज  गुंतवून ठेवायचा तुझ्या  नादात. 
तुझा नीटसा चेहरा हि दिसत नव्हता रात्रीच्या  वेळी,
आणि  मलाही तो चेहरा पहावाच  असं कधी वाटलं नाही. 
एवढ्या दिवस शेजारी राहून कधी ओळख हि नाही झाली आपली,
का मलाच करायची नव्हती काय माहित?
आता तुझ्या आवाजाची आठवण  त्रास देते,
तू म्हणशील त्यात माझा  काय दोष?
कधी  आलीस परत तर  विचार  त्या आपल्या दोघांमध्ये आडव्या येणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या पानांना,
तुझ्या आवाजाने कदाचित ते शहारतील. 
तरी पण तुझा विश्वास नाही  पटला तर साक्षीदार आहेतच कि तुला तुझी रूम समोरची  गच्ची आणि मला  माझी बाल्कनी... 
                                                                                                         - प्राणा...    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जेंव्हा माणसाला जाग येईल

हसणं