स्वार्थ

                                                                          ५. भेट 

हिमांशू - "उद्या भेटशील???"

फुलातून गंध बाहेर पडावा आणि हवेत मिसळून, दूर दूर पसरत राहावं, माझाही तसच झालं होत.     
आम्ही दोघेही तसेच मिसळलो होतो.
 रोज तिला कॉलेज ला जाताना बघायचच, दर मिनीटाला तिच्या मेसेज ची वाट पाहायची, कुवतीप्रमाणे तिच्या सौदंर्यावर  चारोळ्या करायच्या, उगाचच तिला शेंबडी, चपट्या नाकाची, म्हणून  लाडिक चिडवायचं, तिनेही मुद्दाम रुसून बसायचं आणि मी परत तिची मनधरणी करायची.
रोज डोळ्यांची होणारी छोटीशी भेट आता मोठी करावी वाटत होती. तिच्या डोळ्यात डोळे घालून, मेसेज वर नाही, कॉल वर नाही तर सामोरा - समोर १० मिन. बोलावं वाटत होत. म्हणून तिला विचारलं..

स्मिता - "नाही"
हिमांशू  - " का बर तुला नाही भेटू वाटतं का ?"
स्मिता  - " तस नाही, पण नको"

त्याच्यासारखीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मला भेटीची ओढ होती. पण अस  लगेच कस हो म्हणणार ना आणि त्यात भर म्हणून कुठे भैय्याच्या एखाद्या मित्राने पाहिलं तर , कोणत्या काका-काकू ना कळलं तर..
पण असुदे आता प्यार किया तो डरणा क्या? काहीतरी आयडिया  करावीच लागेल.

हिमांशू  - "प्लीज राव एकदाच भेटना परत नाही म्हणणार तुला भेट म्हणून प्लीज.. प्लीज .. प्लीज.. "
स्मिता  - "ठीक आहे, पण उद्या नको."
हिमांशू - "मग कधी आणि कुठे सांग, मी कुठे हि आणि कधीपण तयार आहे."
स्मिता  - " सांगते..  माझ्या सोबत एका मैत्रिणीला घेऊन यावं लागेल चालेल ना "
हिमांशू  - " तुला एकटीला नाही जमणार का ? म्हणजे आपल्याला व्यवस्थित बोलता आलं असत आणि तुझी मैत्रीण पण आपल्याकडे बघत बसणार कस वाटतं ते"
स्मिता - " काही नाही वाटणार तिला, मी सगळं सांगितलंय तिला एकदम जवळची मैत्रीण आहे ती माझी, आपण शनिवारी संध्याकाळी ७ वाजता ज्यूस सेंटर मध्ये भेटूयात, माझा क्लास सुटला कि ती आणि मी येईल,
ती तिचा मोबाइल खेळत बसेल, आपण बोलूयात, तस पण आम्ही रविवारी सगळेदोन तीन दिवसासाठी  गावी जाणार आहोत. "
हिमांशू  - "हो चालेल पण नक्की ये बरका,  मी वाट पाहतोय."

आणि शनिवार आला सकाळ पासून च  'कही ना लागे मन, क्या है ये सुना पण' चालू च होत.  जस जशी वेळ जवळ येत होती तस तस कधी  नाही पण  घरच्यांना खूप काम सुचत होती, चहा न पाजणारा मित्र पार्टी ला आग्रहाने बोलावत होता, शेजाऱ्यांनी तर कधी नाही अशी आवर्जून चौकशी चालू केली होती.
म्हणजे हे नेहमी च असेल बरका पण आज मला वेळ पाळायची होती त्यामुळे त्यावर जास्त लक्ष जात असेल.
नुसतीच वेळ पाळायची नव्हती तर अगोदर १५ मिन. जाऊन तिथं कोणी ओळखीचं नाही ना, तिचा भाऊ, बाप, काका , मामा नाहीत ना याची खात्री करायची होती. आणि एक सुरक्षित जागेचा टेबल  आरक्षित करून ठेवायचा होता.
७:१० झाले तरी तरी ती अजून आली नव्हती, मेसेज करतोय तर बघत नव्हती, कॉल उचलत नव्हती, मनात आला कि आपला पोपट झाला आहे, दोन ज्यूस संपवले आता तिसरा प्यायचा आणि निघायचं.
तेवढ्यात अचानक ती आली समोरची खुर्ची मागे खेचून , मैत्रिणी ला बाजूच्या खुर्चीकडे हात दाखवून बसायला सांगून मला बसता - बसता च म्हणाली " बोल ".
ती एकदम माझ्यासमोर बसली, मी एकदम गडबडून गेलो, काय बोलावं कळेना, मी माझी खुर्ची थोडी बाजूला सरकवली. ती एकदम निवांत बसली होती, किंचितसा हसून, थोडास माझ्याकडे थोडंस  तिरकस टेबल वर ठेवलेल्या मोबाइल कडे बघत होती .
सगळं जीव जिभेत एकवटून बोललो.

हिमांशू - " मला वाटलं तू नाही यायची ?"
स्मिता  - " असं कसं , तू बोलावलं म्हणल्यावर मी येणार च ना."
हिमांशू - " काय घेणार, कोणता ज्यूस सांगू."
स्मिता  - " आमच्या दोघीना पाईन अप्पल "
हिमांशू  - " दाद,तीन पाइनॅप्पल, मग...  बाकी.. "
स्मिता  - " बाकी .. शून्य .."

दोघेही हसलो , पण त्याच्या मनाची गडबड आणि माझी त्याला पूर्णपणे कळत होती. फक्त एवढाच कि मी दाखवत नव्हते. फोन वर तास न तास गप्पा मारणारे आम्हाला  समोरा समोर  शब्द सुद्धा सुचत नव्हते.

हिमांशू  -"असं... म्हणजे... समोरा समोर भेटायची माझी पहिलीच वेळ आहे "

ज्यूस पिताना मी अक्षरश: मी थरथरत होतो ते यावरून मी हे वाक्य बोललो मग नंतर लगेच माझ्या लक्षात आलं कि आपण माती खाल्लीये, माझी पहिलीच वेळ आहे मग तिची काय पाचवी होती का ? समोर बसलेली ती दररोज पाहणाऱ्या तिच्यापेक्षा खूप सुंदर आणि गोड  आहे, हवेने हळूच गालावर आलेली बट आणि हसताना होणार तिचा मंजुळ आवाज, हे तिला सांगावस वाटत होत पण ती मध्येच ती बोलली.

स्मिता  - " चल निघुयात,घरी जायला उशीर होईल. "

 मला पण खूप बोलावसं वाटत त्या भित्र्या भागुबाई सोबत पण काय करणार दोघांनाही शब्द सुचत नव्हते .
जाताना बोलला.

हिमांशू - " गावी गेली तरी वेळ काढून मेसेज करत जा आणि थँक यु  आल्याबद्दल.

भेटीनंतर माझं तर'पेहेला नशा  पेहेला खुमार, नया  प्यार है  नया इंतजार,' असच  काहीस झालाय माझं.
आता ह्या सगळ्यात माझे तीन ज्यूस पिऊन झाले होते, जेवायला तर अजिबात भूक नव्हती पण घरच्यांसाठी जेवणकरावं  लागणार होत.' मला थोडस  च दे जेवायला 'सगळे घरचे असे बघत होते जस काय त्यांना सगळं माहित आहे मि कुठे होतो आणि काय केलं ते.  त्यांचा प्रश्न 'कारे काय झालं भाजी नाही आवडली का ?'
'नाही जरा कसतरी होतंय त्यामुळे भूक नाहीये. '
घरच्यांना काही माहित नव्हतं पण चोराच्या मनात चांदणं म्हणतात तेच खरं .
पण ह्या भेटीत काही बोलणं झालंच नाही. गावावरून आली  कि पुन्हा एकदा भेटतो.

                                                                                                               क्रमश :.... 

प्रेम दोन मनांचं  असत असं मी ऐकलं होत, वर्षनुवर्षं न भेटता न बोलता अनेक लोकांनी आपलं प्रेम टिकवलं , जोपासलं  आणि पूर्णत्वास नेलं हे मी ऐकून आहे.  मग दररोज बोलणारे तुम्ही , भावनांची देवाण घेवाण करणारे तुम्ही, भेटून असं काय वेगळं मिळवणार होतात किंवा काय मिळवायचं  होत.  म्हणजे ह्या भावना नाहीत फक्त शब्द आहेत. तिला बर वाटावं म्हणून त्याने आणि त्याला चांगलं वाटावं म्हणून तिने वापरलेले पोकळ शब्द. मग तिला का बर वाटवून द्यावं त्याने आणि तिने त्यालाका  चांगलं  भासवावं. प्रेमात ना अहंकार ना लोभ. जिथे भावनांशिवाय कोणाला काही उजवं - डाव नाही. मग तिथे का कोणी भासवून द्यावं किंवा चांगलं वाटावं म्हणून काहीतरी करावं. हे करण्यामागे हेतू आहे, आणि हेतू ठेवून केलेलं प्रेम म्हणजे स्वार्थ.

                                                                                                              प्राणा ... 


Comments

  1. प्रणव, खूप छान लिहिलंयस, खूप रिलेट झालं. मजा आली वाचताना😍👌👌

    ReplyDelete
  2. व्वा तात्या मस्त

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जेंव्हा माणसाला जाग येईल

मंजुळा

तू..