Posts

मंजुळा

नुकतीच फुलावी कळी, घ्यावी करतळी,  बहरावी आसमंतात, ना उपमा द्यावी तिज कुणी, ती मोतीचा हो मणी,  उजळी प्रत्येकाच्या उरात, राहावी तू, होती जशी, आहे तशी,  जणू पौर्णिमा तळपत्या उन्हात.  मंजुळा...                                                             #प्राणा...

हसणं

हसणं जणू संथ वाहणाऱ्या पाण्याच्या शांत लाटा. ते हसणं हळुवार हवे ने सळसळणाऱ्या पानांचा होणारा आवाज. ते हसणं सायंकाळच्या क्षितिजाच्या किरणांचा आणि दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्याचा मिलाप. ... ते हसणं इतकं निरागस की घरच्या गरिबीला आणि बाहेरच्या मुजोरी ला ही शरम येते. ते हसणं इतकं निखळ, वाट्याला आलेलं प्रत्येक दुःख निखळून नेत. ते हसणं एवढं नितळ, मनातल्या वेदना, उद्याची भ्रांत, वेड्यावाकड्या नजरा आरामात गढळून टाकत. तस हे हसणं लई रुबाबदार बरका पण सापडत रस्त्याच्या सिग्नल वर. हे हसणं निर्माण होत सडक निर्माण  च्या कामावर. हे हसणं भटकत राहत डोंगरदऱ्यातून उद्याचा आसरा शोधत. ह्या हसण्याचा आदि आणि अंत असाच होतो बघ्यांकडे बघत आणि स्वतः ला माणूस म्हणून  लपवत.. पिढ्यान् पिढ्या...                                                              प्राणा......

स्वार्थ

                                                                          ५. भेट  हिमांशू - "उद्या भेटशील???" फुलातून गंध बाहेर पडावा आणि हवेत मिसळून, दूर दूर पसरत राहावं, माझाही तसच झालं होत.      आम्ही दोघेही तसेच मिसळलो होतो.  रोज तिला कॉलेज ला जाताना बघायचच, दर मिनीटाला तिच्या मेसेज ची वाट पाहायची, कुवतीप्रमाणे तिच्या सौदंर्यावर  चारोळ्या करायच्या, उगाचच तिला शेंबडी, चपट्या नाकाची, म्हणून  लाडिक चिडवायचं, तिनेही मुद्दाम रुसून बसायचं आणि मी परत तिची मनधरणी करायची. रोज डोळ्यांची होणारी छोटीशी भेट आता मोठी करावी वाटत होती. तिच्या डोळ्यात डोळे घालून, मेसेज वर नाही, कॉल वर नाही तर सामोरा - समोर १० मिन. बोलावं वाटत होत. म्हणून तिला विचारलं.. स्मिता - "नाही" हिमांशू  - " का बर तुला नाही भेटू वाटतं का ?" स्मिता  - " तस नाही, पण नको" त्याच्यासारखीच कि...

जेंव्हा माणसाला जाग येईल

जेंव्हा माणसाला जाग येईल निपचित, बेहोश, बेधुंद, पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धेच्या जीवनातून जेंव्हा माणसाला जाग येईल. तेंव्हा कळेल वर्षानुवर्ष न कळलेली नाती, भावनांची सरबत्ती आणि न उमगलेल प्रेम. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून, आपल्या ल कोणाचं काही घेणं देणं नाही म्हणणार तू, स्वतः साठी का होईना घेणं देणं नसणाऱ्यांची काळजी करशील. जेंव्हा तुला जाग येईल तेंव्हा रुग्ण नसतानाही तू एकमेकांची काळजी घेशील. तो काळ गेला आता जेंव्हा भगवान शंकर येऊन तू गटार केलेल्या गंगेला शिरावर घेतील, या वायुत पसरलेल विष पिऊन वायू शुद्ध करतील. हा खुळचट विचार सोडून दे. जेंव्हा तुला जाग येईल तेंव्हा पक्षी स्वच्छंद भराऱ्या घेत असतील शुद्ध हवेत. मोबाईल सारखं खेळणं बनवाव आणि त्या खेळण्याने आपल्यालाच त्याच खेळणं बनवाव, अगदी तसच पण जरा मोठा खेळ चालू आहे आत्ता, पण ह्या खेळात दाखवून द्यायचं य  तुला की जगरहाटी कशी चलती ये, म्हणलं तर माणसांनी माणसांसाठी त्याच्या जीवन समृध्दी साठी चालवलेली कसरत. हे कळेल जेंव्हा तुला जाग येईल. नाहीतर भविष्यात ला बंदिवास अटळ आहे.         ...

स्वार्थ

4. सवय  गप्पा दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या, FB वरून आता INSTA., WHATSAPP , कॉल्स  असं सगळं एकदम सुंदर आणि एकमेकांच्या सहवासात आयुष्य सगळं बहरून गेलं होत.  हिमांशू  - कस सांगावं तिला, तिला तर सगळं च माहित आहे म्हणा कि माझं तिच्यावर प्रेम आहे.                आज काल तिच्याशिवाय दिवस सुरूही  होत नाही आणि संपत हि नाही. ती जर नाही म्हणाली तर,              मला फक्त तुझ्याबरोबर मैत्री ठेवायची आहे बाकी काही नाही असं म्हणाली तर...              कस सांगावं काळत नाहीये.  स्मिता - तो एवढा साधा आहे ना, त्याचा प्रत्येक शब्द न शब्द ऐकत राहावं वाटत,             तासनतास  बोलत बसावसं वाटत. हे प्रेम च आहे,             पण त्याला सांगू कि नको किंवा त्याने स्वतः हुन सांगितलं तर...  हिमांशू - एक विचार असा येतो कि सांगून टाकावं जे काही मनात आहे ते.     ...

एकरूप

                                एकरूप    करशील जरी तू हजार कामे, हर कामावर तुझा ठसा हवा,   प्रत्येक कामाशी इमानी तू, परी हर कामातून हवा सुधार नवा,              सगळ्या कामातून आणि सुधारणेतून,                      तू गुणवत्तेशी एकरूप हवा.                 उत्पादकतेच्या शर्यतीस तू तय्यार हवा,                       जोश हवा जरा जल्लोष हवा,            तुज कुशलतेचा आणि  ज्ञानाचा   भांडार  हवा,            सर्वदर्षणी, सर्वकर्मनी गुणवत्तेशी तू एकरूप हवा.    Uni-tech automation  च्या अखंडित प्रगती चा ध्यास हवा,           त्यासाठी तू गुणवत्तेशी एकरूप हवा.      ...

तू..

                                         तू... बरेच दिवस झाले तुला संगेन म्हणतोय, मनात आलेलं, जिभेवर अडखळलेलं, कधी हृदयाच्या धडधडीने पळून गेलेलं, तुझे खूप मजनू असतील, आशिक असतील, पण मी तुझा चाहता आहे, का, कशासाठी माहीत नाही, पण कधीपासून तर तुला जेंव्हा पाहिलं तेंव्हा पासून, प्रत्येक गाण्याच्या चालीवर, प्रेमाच्या प्रत्येक रसिक वाटेवर तू दिसायचीस माझ्यासोबत नसूनही, तू माझी अबोल कविता आहेस कधीही न बोललेली, तुला न ऐकवलेली पण आता ती उतरवतोय भावनेतून शब्दात. आयुष्यात भरपूर गोष्टी करायच्या राहून जातात, त्याच शल्य ही राहतात मनात, पण तू माझ्या मनावर अधिराज्य केलय  हे न सांगितल्याच शल्य मला नको होतं म्हणून.... तुझा अनामिक, अबोल चाहता.                                                 प्राणा...